04/02/26
Breaking News

परभणीत भारतीय जनता पार्टीचे 41 उमेदवार जाहीर

परभणी,दि.30(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने एकूण 65 जागांपैकी 41 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले असून उमेदवार निश्‍चित करतेवेळी पक्षाने सामाजिक समिकरणेसुध्दा जूळविण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभाग क्रमांक 1 अ मधून प्रसाद उर्फ बबलू नागरे, ब मधून तिरुमला मोकिंद खिल्लारे, क मधून वैशाली दत्तात्रय दैठणकर व ड मधून दत्तराव तुकाराम रेंगे, प्रभाग क्रमांक 4 अ मधून कल्याणी संजय स्वामी, ब मधून सपना व्यंकट जुक्टे, क मधून विश्‍वजित बुधवंत, ड मधून रामप्रसाद जिजाजी शिंदे, प्रभाग 5 अ मधून गणेश नंदकुमार टाक, ब मधून सौ. मीनाताई सुरेशराव वरपुडकर, क मधून गिरीजा शंकर आजेगांवकर, ड मधून रितेश कांतीलाल झांबड, प्रभाग क्रमांक 6 अ मधून अजय बापूराव वाघमारे, क मधून शारदा मुकेश गाडे, ड मधून रोहन केरबा काळे, प्रभाग क्रमांक 7 अ मधून निकिता सुदर्शन बनसोडे, ब मधून शहनाज अतिक पटेल, ड मधून नरेश विलास लंगोटे, प्रभाग क्रमांक 8 अ मधून शकीला बेगम अहेमद मजीद, ब मधून शबीया अब्दुल कबीर, क मधून अशोक डहाळे, ड मधून अनिल हिरामन झांबरे, प्रभाग क्रमांक 9 अ मधून सचिन अंबिलवादे, ब मधून गीता गजानन अंबेकर, प्रभाग क मधून सरस्वती फालाजी रेंगे, ड मधून सुनील गुलाबराव देशमुख, 10 अ मधून निर्मला बाळासाहेब वाघमारे, ब मधून विजयमाला अभिजित मुंडे, क मधून डॉ. राजू सुरवसे, ड मधून सागर सुरेश शिंदे, प्रभाग क्रमांक 12 अ मधून भिमराव वायवळ, ब मधून अनुसया भालचंद्र गोरे, क मधून अ‍ॅड. नसरीन पठाण, प्रभाग 15 अ मधून मंगल मुदगलकर, ब मधून सुशिला जिजा थोरात, क मधून अद्वैत चंद्रकांत सांगळे-पार्डीकर, ड मधून अश्‍विनी प्रमोद वाकोडकर, ई मधून डॉ. केदार खटींग, प्रभाग 16 अ मधून जयश्री शामराव पुंडगे, क मधून जयश्री अश्रोबा धबाले, ड मधून मोहम्मद गौस मोहम्मद हनीफ यांचा समावेश आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …