09/05/26
Breaking News

शासकीय रेखाकला परीक्षा नूतन विद्यालयाचे ९२ विद्यार्थी एक ग्रेड प्राप्त

सेलू (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षा २०२५ -२६चा निकाल ९ जानेवारी रोजी जाहीर झाला.
नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी आणि इंटर मिजिएट परीक्षेत तब्बल ९२ विद्यार्थ्यांना ए ग्रेड तर ६६ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला.
नूतन विद्यालय सेलू केंद्राचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल ९५.८०% तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९९.०९% असा लागला आहे.

शासकीय रेखा कला परिषद गुणवंत विद्यार्थ्यांना नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे , कलाशिक्षक फुलसिंग गावित यांनी परिश्रम घेतले.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …