04/02/26
Breaking News

माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश,परभणीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळणार बळ

 

परभणी,दि 07 ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.यापुर्वी दैनिक शब्दराजने सर्वात आधी दुर्राणी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची बातमी प्रसिध्द केली होती.
दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व केलेले दुर्राणी हे जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत.जिल्हा परिषद,नगरपालीका यांच्यावर त्यांची पकड राहीलेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसला त्यांच्या प्रवेशामुळे नवसंजिवणी मिळणार आहे.आगामी सर्वच निवडणुकात त्यांचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.
मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यास परभणी जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी यावेळी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. दुर्राणी याच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख आदींसह परभणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात श्री आलमगीर खान, श्री सुभाषराव कोल्हे मा.जि.प.सभापती, श्री नारायणराव आढाव मा.पं.स.सभापती, श्री विजयकुमार सिताफळे संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री दत्ताराव मायंदळे संचालक, जि.म.स.बँक परभणी, श्री जुनैद खान दुर्राणी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री कलीम अन्सारी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री नितेश भोरे मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री एम.ए.मोईज अन्सारी मा.नगराध्यक्ष न.प.पाथरी, श्री श्याम धर्मे उपसभापती कृ.उ.बा.स.पाथरी, श्री अमोल बांगड संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री आनंद धनले संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री संदिप टेंगसे संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री अशोक अरबाड संचालक कृ.उ.बा.स.पाथरी, श्री हन्नान खान दुर्राणी मा.उपाध्यक्ष न.प.पाथरी, श्री नसिरोद्यीन सिद्यीकी तात्या मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री राजेश पाटील (रिंकु) मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रंगनाथ विरकर मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री सुखदेव चिंचाणे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री आबासाहेब कोरडे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री इम्रान हुसेनी मा.नगर सेवक परभणी, श्री संदिप हिवाळे मा.नगर सेवक परभणी, श्री शेख सलमान उपसरपंच पेडगांव, श्री संतोषराव लाडाणे, श्री राजीव पामे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री शेख मुस्तफा टेलर मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रफिक अन्सारी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री हबीब अन्सारी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री रज्जाक कुरेशी मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री नारायणराव पितळे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री सुनिल उन्हाळे मा.शराध्यक्ष, श्री लिंबाजी मिरजे मा.उपशहराध्यक्ष, श्री श्याम ढवळे वंचित वहुजन आघाडी, श्री दिलीप ढवळे, श्री दादाराव गवारे, श्री मिलींद आठवे, श्री भास्करराव काळे मा.नगर सेवक न.प.पाथरी, श्री हबीब कुरेशी, श्री मुखीद जहागीरदार, श्री संदीप भदर्गे, श्री बबलु खुरेशी, श्री अन्सारी मुस्तफा, श्री शेख खुर्शिद श्री ॲड.मलिक पटेल सर, श्री जाबाज खान, श्री माजेद अली, श्री अनिसोद्यीन फारोखी, श्री राहुल भाले, श्री अमोल बोराटे, श्री सय्यद नजीर, श्री मल्हास कसबे, श्री प्रकाश कटारे, श्री आसेफोद्यीन अन्सारी, श्री नईम खान, श्री महेमुद अतार, श्री परवेज पठाण, श्री नितिन ढवळे, श्री हमिद शाह, श्री रईस अन्सारी, श्री शगीर अन्सारी, श्री हातीम अन्सारी, श्री विठठल कदम, श्री विष्णु वैराळ, श्री पोपटराव फरतडे, श्री गजानन गलबे, श्री वैजनाथ महिपाल सरपंच, श्री राहुल कोल्हे, श्री बालासाहेब मुजमुले सोसाटी संचालक, श्री परमेश्वर आढाव सोसायटी संचालक, श्री बन्सी पाटील चेअरमन सोसायटी, श्री पाराजी वरकड, श्री पवनराव लाहे सोसायटी संचालक, श्री राधाकृष्ट जाधव, श्री विठठलराव आढाव सोसायटी संचालक, श्री मुंजाभाऊ आढाव ग्रा.पं.सदस्य, श्री भारतराव आढाव, श्री सिध्देश्वर नाईकवाडे सोसायटी संचालक, श्री विठठलराव आढाव सरपंच, श्री अंकुशराव उपसरपंच बानेगाव, श्री रोहिदास निर्सगन, श्री वाहेद पठाण, श्री अजितराव कोल्हे, श्री तातेराव कोल्हे, श्री राहुल कोल्हे, श्री जगदीश कोल्हे, श्री रामप्रसाद कोल्हे, श्री मुंजाभाऊ वाघमारे सरपंच बांदरवाडा, श्री मोईज अन्सारी ग्रा.पं.स. श्री शिवाजी साळवे, श्री बाळुभाऊ खरात ग्रा.प.स., श्री सतिशराव साळवे, श्री हरीश पठाण ग्रा.पं.स.,श्री सय्यद मेहराज भाई या शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्या मध्ये उपस्थित राहुन ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ पक्षात प्रवेश केला आ

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …