परभणी,दि 08 ः
रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने, व पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या सहकार्याने, (बालेवाडी) जिल्हा पुणे येथे २२ते २४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धा होनार असुन १७वषा वया गटातील २००८,२००९,२०१० जन्मतारीख असलेले खेळाडू व १२ वर्षे वयोगटातील २०१३,२०१४,२०१५ जन्मतारीख असलेल्या मुला-मुलींनी जन्मतारखेचा पुरावा (जन्मदाखला) तसेच खेळाडू पोशाख घेऊन दिनांक
जिल्हास्तरीय 10 ऑगस्ट वार रविवार रोजी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा होणार असुन व यातुनच जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असुन या स्पर्धेसाठी योगेश आदमे बालाजी मुंडे शेख काशीफ वैभव खुणे आशिष परदेशी यांची निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदरील स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघाने व खेळाडूंनी 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक 11.०० वाजता उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव शिवाजी खुणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रग्बी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नारायण बनसोडे उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे व सचिव शिवाजी खुणे यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com