04/02/26
Breaking News

येलदरी धरणातून कोणत्याही क्षणी सोडणार पाणी

परभणी,दि.11(प्रतिनिधी) : खडकपूर्णा प्रकल्पातून 2 गेटद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळे येलदरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून येलदरीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. सोमवारी सकाळी या जलाशयात 89.74 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याद्वारे येथून पुढे केंव्हाही येलदरी येथील जलविद्युत केंद्रातील टर्माइनला व नदीपात्रातसुध्दा पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे जाहीर केले आहे.
दरम्यान, नदीपात्रावरील शेतकर्यांनी आपआपले नदीपात्रातील साहित्य किंवा जनावरे हटवावीत, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 89.74 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी असून यामध्ये 124.670 दलघमी हा मृत साठा आहे, तर 809.770 दलघमी जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात 726.675 दलघमी जिवंत तर 124.670 मृत पाणीसाठा असून एकूण पाणीसाठा 851.345 दलघमी इतका झाला आहे. जलाशयातील पाणी पातळी 460.950 मीटर झाली आहे. यामुळे येलदरी धरण सध्या 89.74 टक्के क्षमतेने भरलेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरणात 13.257/335.620 दलघमी पाण्याची आवक झाली.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …