24/03/26
Breaking News

पाथरीत आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त मताधिकार जनजागरण रॅली

पाथरी,दि 12 (प्रतिनिधी) ः
लोकशाहित जनताच चालक पालक व मालक असते .जबाबदार शासन व्यवस्थेसाठी मतदाराची भुमिका फार महत्वाची असते .म्हणुन युवकात जनजागरणाची गरज आहे असे मत डाॅ.साहेब राठोड यांनी रॅलित मताधिकाराचे महत्व समजाऊन सांगितले . युवकांच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी व युवकांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग स्व. नितीन महाविद्यांयालयाच्या वतीने दि. १२ऑगष्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त मताधिकार जनजागरण भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले . या रॅलीत उप प्राचार्य. डॉ.एस टी सामाले ,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.जी जे मोरे , डॉ.सुंदर गजमल,डॉ. जे एम बोचरे ,प्रा.टी एफ काळे, प्रा.संजयसिंग ठाकुर , डॉ.मधुकर ठोंबरे , राजाभाऊ मोगल ,डाॅ.हनुमान मूसळे, डॉ.पवार मॅडम, डॉ.बदने मॅडम,डॉ.गायकवाड,डाॅ.सोनुले,डॉ.बाबरे सुमेध चव्हाण आदी कर्मचारी ऊपस्थीत होते.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …