07/05/26
Breaking News

 काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन

परभणी, दि. 14 (प्रतिनिधी)
परभणी व जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली.त्यांच्या विकासदृष्टी, लोकसंग्रह आणि संघटन कौशल्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व लोकहितैषी, विकासाभिमुख व सर्वसमावेशक राजकारणाची प्रेरणादायी आठवण व्यक्त केली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास माजी उपमहापौर भगवानजी वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, पंजाबराव देशमुख, विनोद कदम, अमोल जाधव, सुहास पंडित, शजी अहेमद खान, दिगंबर खरवडे, शंकर नाईकवाडे, श्रीराम जाधव तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …