04/02/26
Breaking News

अखिल भारतीय ग्राहक पंचायत नूतन कार्यकारणी जाहीर

सेलू दि. 18 शनीवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक केशवराज बाबासाहेब मंदिर रोड वरील योगा हाॅल मध्ये दि 16 शनिवार रोजी संपन्न झाली असुन या बैठकीत सेलू तालुक्यातील कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांनी जाहीर केली असून या बैठकीस देवगिरी प्रांताध्यक्ष डाॅ विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, जिल्हा समन्वयक भगवान करंजे, जिंतूर तालूका अध्यक्ष मंचकराव देशमुख,जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड, आदि उपस्थित होते
या निवड कार्यकारणीस डाॅ विलास मोरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक सुनील गायकवाड केले.असुन निवड करण्यात आलेले नूतन कार्यकारिणीत तालूका अध्यक्ष सतिश जाधव, उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, सचिव रविकांत कुळकर्णी, सहसचिव सुनील गायकवाड, कोषाध्यक्ष के डी वाघमारे,आय टी सेल प्रमुख मंजुषा कुळकर्णी, प्रचार प्रसिद्धी प्रमुख शुकाचार्य शिंदे,पर्यावरण आयाम प्रमुख नागोराव देशमुख, पि एस कौसडीकर, आदिंची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर कान्हेकर तर आभार शुकाचार्य शिंदे यांनी मानले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …