04/02/26
Breaking News

रेल्वेही सामाजिक अभिसरणाचे एकमेव केंद्र म्हणजे भारतीय रेल्वे-रविकिरण गंभीरे

सेलू ( प्रतिनिधी )
समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे अत्यंत कमी पैशात छान प्रवास करता येणारे आणि ग्रामीण शहरी वा कुठलाही भेदाभेद न करता आपलेपणातून. सर्व प्रवाशांना समान मानून आपल्या पोटात सामावून घेत आपला प्रवास सुखकर करणारे साधन म्हणजे रेल्वे. रेल्वेतील प्रवासी आणि प्रवास हा माणसा माणसातील माणूसपण जागृत करायला भाग पाडतो.माणसाला माणुसकी जपायला व शिकायला भाग पाडतो. आपणं ज्यावेळी रेल्वे प्रवासात असतो.तेव्हा अनेक गुण दोष वृत्ती- प्रवृत्तीच्या,स्वभावाच्या माणसांकडून प्रवाशाला खूप काही शिकायला मिळते.
असे प्रतिपादन एक दिवस एक पुस्तक या उपक्रमात ” रेल्वेची रंजक सफर ” या पुस्तकाचे विवेचन रविकिरण गंभीरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात (ता.१८) आयोजित कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप जोहिरे हे होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की रेल्वेही सामाजिक अभिसरणाचे केंद्र आहे.
अध्यक्षीय भाषणात शिवनारायण मालाणी यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या कामांची माहिती देतानाच त्यांनी आपल्या हक्कां सोबतच आपली रेल्वे सेवा सुधारण्यासाठी कोणती कर्तव्य आहेत याची जाणीव प्रत्येक प्रवाशाने ठेवली पाहिजे हेही नमुद केले.
प्रमुख पाहुणे प्रदीप जोहीरे यांनी रेल्वेच्या सेवेमध्ये होत असलेले बदल आणि त्या बदला सोबत आपण स्वतः बदल करून अपडेट होण्याचा आणि रेल्वेसेवेचा आनंद घेण्याचा सल्ला दिला.

याच कार्यक्रमात प्रमिला धापसे लिखित “हाफ मेंटल” या कादंबरीचे प्रकाशन महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेक, हेमंत आडळकर, डॉ शरद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एम देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन मौजम शेख यांनी केले . शेवटी प्रा. ए टी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमास
ए टी मदने,प्रा राजाराम झोडगे,प्रा.अनंत मोगल,
सुरेशअंभईकर,विशाल काला , शामसुंदर भुतडा, अजित मंडलिक, रवींद्र कुलकर्णी
यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …