04/02/26
Breaking News

पाय घसरून पडल्याने दोन इसम पाण्यात वाहून गेले

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील राजेवाडी ते वालूर रस्त्यावरील दुधना नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. सतत दोन दिवस चालू असलेला पाऊस व लोअर दुधना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. सदरील पुलावरून तालुक्यातील दोन इसम छबुराव जावळे राहणार गुळखंड व मारुती रामभाऊ हरकळ राहणार वालुर हे पाय घसरून पाण्यात पडून वाहून गेले आहेत.

 

 

घटनेची माहिती कळताच तहसीलदार डॉ शिवाजी मगर, तलाठी काकडे, सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पी एस आय गणेश पवार हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनासोबतच गावकरी, तरुण मंडळी देखील त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु आतापर्यंत त्यांना या प्रयत्नात यश आले नसल्याची माहिती तलाठी काकडे यांनी दिली आहे. शोध मोहीम अजून देखील चालूच आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …