04/02/26
Breaking News

कागदपत्रांसाठी शिक्षकांना वेठीस धरू नका, आ. विक्रम काळे यांची मागणी

परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः
शालेय शिक्षण विभागानेच शाळांमधील नियुक्त शिक्षकांना मान्यता दिलेल्या असताना त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.त्यासाठी शिक्षकांचा पगारही थांबविण्याचा इशारा दिलेला आहे.शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश मागे घेण्याची मागणी करत असताना तुम्हीच मान्यता दिलेली असून तुमच्या कार्यलयातही संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत.त्यामुळे शिक्षकांकडून त्यांची कागदपत्रे मागून त्यांना वेठीस धरू नका अशी मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी शालेय शिक्षण संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.शालेय शिक्षण आयुक्तांनी नागपुरच्या शालार्थ घोटाळ्यामुळे ऑगष्ट महिन्याचे वेतन देयकांना मंजुरीपूर्वी सर्व शिक्षकांचे मूळ नियुक्ती आदेश ,रुजू अहवाल,शालार्थ आयडीला सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यता ॲपवर अपलोड करण्यासह हार्ड कॉपी वेतन विभागात जमा करण्याचे आदेश दिले.शालार्थ प्रणालीनुसार वेतन घेत असलेल्या सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अद्यावत माहिती ह्यापूर्वीच संस्थेने,शाळेने त्या त्या शिक्षणाधिकारी कार्यालयात दिलेली आहेत.ती तपासून घेण्यात यावी व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्ववत ठेवण्यात यावे.
त्यामुळे शालार्थ आयडी वेतन प्रणाली सुरू झाल्यापासून शिक्षण विभागानेच कागदपत्रे तपासून मान्यता व आयडी दिली असल्याचेही आ.विक्रम काळे यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …