24/03/26
Breaking News

मुंबईत खाण्याची पिण्याची ठिकाणे बंद…बीड जिल्ह्यातून 50 हजार भाकरी रवाना

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचले आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र, तिथे गेलेल्या बांधवांची खाण्या पिण्याची गैरसोय होत आहे. हे पाहून बीड जिल्ह्याच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेने पाठवले जात आहे.आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजार भाकरी, चटणी, ठेचासह गाव खेड्यातून दवंडी देऊन ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजार भाकरी, चटणी, ठेचासह गाव खेड्यातून दवंडी देऊन ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.मात्र, आझाद मैदानावरील मराठा बांधवांना जेवण्याची गैरसोय होत असून हॉटेल त्याचबरोबर चहा पाण्याची दुकान बंद करण्यात आली असल्याचे कारणावरून हा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

प्रत्येक गावातून बाजरीची भाकरी, ठेचा मुंबईला रवाना

मुंबईला गेलेल्या मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गावातून बाजरीची भाकरी, ठेचा लोणचं त्याचबरोबर चटणी बांधून मुंबईला पाठवण्यात येत आहे.

प्रत्येक घरातून दहा-दहा भाकरी

प्रत्येक गावात प्रत्येक घरातून दहा-दहा भाकरी बांधून त्यासोबत ठेचा लोणचं चटणी सुकी भाजी बांधून मुंबईतील मराठा बांधवांसाठी टेम्पोने पाठवत आहेत.

50 हजाराहून अधिक भाकरी मुंबईच्या दिशेने

त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून गावागावातून दवंडी घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे. बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी जवळपास 50 हजाराहून अधिक भाकरी मुंबईच्या दिशेने पाठवले असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …