21/07/26
Breaking News

कळगाव येथील विकास कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पूर्णा,ता 04 ः
कळगाव येथील विविध कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व  प्रहार जनशक्ती पक्षाने पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायत कळगाव अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस कामे दाखवून निधीचा गैरवापर केलेला आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

1. घरकुल योजनेची चौकशी (वर्ष 2022-23, 2023-24, 2024-25):
पीएम आवास, रमाई, सबरी आणि इतर घरकुल योजनेतील लाभार्थींची माहिती,
त्यांच्या 8 नंबर फॉर्म्स व इंजिनियरने घेतलेले जिओ टॅग फोटो देण्यात यावे
2. 14वा व 15वा वित्त आयोग अंतर्गत निधी:
सन 2022 ते 2025 या कालावधीत किती निधी प्राप्त झाला व कोणत्या कामांवर खर्च केला गेला याची सविस्तर माहिती.
3. सभागृह, नाली, गट्टू कामांची माहिती:
निधी, कामांचे विवरण, व साहित्य खरेदी याची लेखी माहिती द्यावी
4. उपआरोग्य केंद्र संदर्भात:
प्राप्त निधी, व आजपर्यंत उपआरोग्य केंद्र ची सेवा का सुरू नाही गावकरी मंडळी यांना त्या म लाभ काय आहे.याची चौकशी करून दोषींवर कारवाई.
5. MRGS योजनेंतर्गत रस्त्यांची माहिती:
किती रस्त्यांचे काम सुरू आहे व त्यासाठी किती निधी मिळाला आहे याची माहिती.

6. पाणी फिल्टर प्रकल्प:
निधी किती आला, व फिल्टर का बंद आहे याची चौकशी करून गावकरी मडळी साटि स्वच्छ पाणी पुरवठा चालु करावा.

7. ग्रामसभा व ठराव (2023 ते 2025):
ग्रामसभेचे ग्रामसेवक यांनी जो ठराव पास केला आहे त्या ठरावाची सत्य देण्यात यावी

8. दिव्यांग 5% निधी वाटप:
निधी वाटप झाला आहे का?दिव्याग लाभार्थ्यांची नावे किती निधी वाटप केलेले आहे व दिव्यांना काहि साहित्य वाटप केले आहे साहित्य वाटप केलेल्या च्या पावत्या देण्यात याव्यात
9. घरकुलापासून वंचित लाभार्थी:
अल्पभूधारक, दिव्यांग, निराधार, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे.व लाभार्थी यांना लाभा पासून का वंचित ठेवण्यात आलेले आहे याची माहिती द्या

10. इतर विभागांमार्फत ग्रामपंचायतला प्राप्त निधीची माहिती (2023 ते 2025):
निधी कुठून आला व कुठे खर्च झाला याची लेखी माहिती.

कळगाव येथे येऊन आपण या कामाची चौकशी करून लेखी स्वरूपात अहवाल द्यावा व दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.अन्यथा, दिनांक 16.09.2025 रोजी गावकरी व प्रहारच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. यावेळी उपोषणकर्त्यांना काही अनुचित घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.यावेळी शिवहार सोनटक्के पिंपरणकर ( प्रहार तालुका प्रमुख पुर्णा ) विष्णु बोकारे (प्रहार सर्कल प्रमुख ताडकळस)सचिन सूर्यवंशी, दिगाबर पोले , नागनाथ भांगे अनिल वावळे पिंटू सूर्यवंशी, दत्ता पोले, हनुमंत सोपान पोले सिद्राम पोले रहिमान शेख, लिंबाजी पोले, पप्पू सूर्यवंशी उपस्थित होते.

Check Also

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील …