परभणी,दि 07 ः
गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांडा पडेगाव येथे संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आय सी यु च्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त भव्य सर्व रोग निदान उपचार व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत देशमुख हे होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भुमरे,सूर्यकांत देशमुख, आकाश लोहट यांचा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेल्या या उमला नाईक तांड्यातील स्वागत सन्मानाने मी भारावून गेलो .या तांड्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास सुरेश भुमरे यांनी मनोगतातुन गावकरी मंडळींना दिला.
तसेच या दुर्गम भागात परभणी आयसीयू व संकल्प फाउंडेशनने ठेवलेल्या या भव्य शिबिराचे व डॉ.सूर्यकांत देशमुख यांच्या वैद्यकीय सामाजिक सेवेबद्दल भरभरून कौतुकही केले.
भाजपा जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट यांनी आपल्या मनोगतातून सर्व रोग निदान उपचार शिबिराचे महत्त्व प्रतिपादित केले.
कार्यक्रमासाठी श्रीमती रोहिणी देशमुख, संतोषराव टोले, डॉ आत्माराम पुरी,डाॅ. मोरे,डॉ शिंदे, डॉ सुरज विखे, भरतराव जाधव, प्रभाकरराव शिंदे, रोहीतजी राऊत बालाजीराव कच्छवे , ओम प्रकाश जवळकर,सुरेखा संजय राठोड, वामन राठोड, राजुदास राठोड यांच्या सह गावातील सर्वांची उपस्थिती होती. शिबिरातून 220 जणांनी तपासणी करून सहभाग नोंदवला.
या भव्य शिबिराच्या आयोजनाबद्दल गणेश युवक मित्र मंडळ च्या वतीने परभणी आय सी यु व संकल्प स्वराज्य फाउंडेशन चे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल निरस प्रस्ताविक शामसुंदर निरस तर आभार गणेश राठोड यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश युवक मित्र मंडळ उमला नाईक तांडा यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.
Shabdraj www.shabdraj.com