04/02/26
Breaking News

सौरभ जाधव जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद

परभणी,दि 07 ः
मरडसगाव ता. गंगाखेड येथे सौरभ जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,केरवाडी व बळीराजा विदयालय, मरडसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सौरभ जाधव यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 4 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून संस्थेचे सहसचिव प्राचार्य कामजी जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माणिक जाधव हे होते. प्रमुख पाहुणे गंगाधर कांबळे, परिक्षक नवनाथ जाधव, प्रा.डॉ. तुकाराम बोबडे, आत्माराम जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुनिल जाधव केरवाडीकर, ट्रस्टचे विश्वस्थ सुभाष ढगे, संस्थेचे संचालक गंगाधरराव करवर, राजेश बडवणे आदि उपस्थित होते.
या सपर्धेचे बक्षीस वितरण संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना आत्माराम टेंगसे म्हणाले की, वक्ता हा हजारात एक असतो. वक्तृत्वाने कर्तृत्व सिद्ध होते व कर्तृत्वातून नेतृत्व उभा राहते. विचाराने संपन्न असणारे नेतृत्व राष्ट्र उभा करू शकते. वक्तृत्व हे विद्यार्थ्यांचे आकलन क्षमता वाढवते. संवाद, संभाषण, वाचन कौशल्याचा विकास होण्यास मदत करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धांमधून सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे.
या स्पर्धेत प्रथम (4000₹ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह)हर्षदा हरिभाऊ मोगल ( नूतन विद्यालय सेलू ), द्वितीय(3000₹ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह) कविश रामेश्वर बेदरे (सरस्वती विद्यालय, गंगाखेड)
, तृतीय (2000₹ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह) शुजाउद्दीन नजमोद्दीन काझी ( बाल विद्यामंदिर हायस्कूल परभणी ) व ऋतुराज प्रमोद साखरे (भारतीय बाल विद्यामंदिर परभणी ) उत्तेजनार्थ पारितोषिक ( 500₹ प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह) 1) रूपाली संभाजी पवार ( छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन ) 2) साईनाथ बालासाहेब अंभोरे ( ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी ) 3) तेजस्विनी भास्कर पौळ ( गांधी विद्यालय नवा मोंढा परभणी ) 4) समर्थ देविदास येवंदगे ( भारतीय बाल विद्यामंदिर परभणी ) आदींनी पारितोषिक प्राप्त केली. या स्पर्धेचे प्रथम वर्ष असतांना व स्पर्धा ग्रामीण भागात असतांना सुद्धा जिल्हाभरातील 44 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य आत्माराम टेंगसे, संस्थाध्यक्ष सुनील जाधव केरवाडीकर, सहसचिव प्राचार्य कामाजी जाधव, ट्रस्टचे सदस्य सुभाष ढगे,ग़ंगाधरराव करवर, मुख्याध्यापक अशोक कोरडे,परीक्षक नवनाथ जाधव, प्रा. डॉ. तुकाराम बोबडे, गझलकार आत्माराम जाधव आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष ढगे यांनी मांडले तर सूत्रसंचलन गोविंद शिंदे यांनी केले व आभार दिपक वाकडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक गोपी मुंडे, राजेश बडवणे, गोविंद बडवणे, कोमलवार , मोरताटे, राजू इचनर, अनिरुथ निळे, बसवराज सुरावार यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …