सेलू (प्रतिनिधी) : सेलूतील दिगंबर जैन समाजाच्या वतीने “दक्षलक्षण महोत्सव”निमित्त सोमवारी, ९ सब्टेबंर रोजी विविध धार्मीक प्रवचने, कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांसह, महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी साडेआठच्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांने पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.दक्षलक्षण पर्वा निमित्त गेल्या आठ दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे, आयोजन करण्यात आले होते. पंडित विराग शास्त्री, जबलपूर ,पंडित सम्यक जैन, मुंबई यांचे प्रवचन दहा दिवसांमध्ये “मेरी भावना” या विषयावर उद्बोधक, प्रेरणादायी प्रवचन संपन्न झाले. सकाळी अभिषेक, सामूहिक पूजन, प्रवचन तसेच दुपारी पंडित सम्यक जैन यांची कक्षा ,प्रवचन संपन्न झाले. संध्याकाळी पाठशाला,आरती,प्रवचन व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . जलाभिषेकांसह ,स्वाध्याय,ध्वजारोहण,अभिषेकपूजन,विविध धार्मिक विधी उत्सव ,भजन संध्या,विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. सामुदायिक महाप्रसाद चा सर्वांनी लाभ घेतला. “दस लक्षण पर्व” यशस्वी करण्यासाठी समाजाच्या सर्व साधर्मी श्रावक ,श्राविकांनी तसेच युवा वर्गानी परीश्रम घेतले.बहू मंडल, महिला मंडळ, पाठशाला मंडळ च्या वतीने विविध स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,नृत्य ,नाटिका घेण्यात आल्या . उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
Shabdraj www.shabdraj.com