परभणी,दि 10 ः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत राज्यभरात तसेच भाजपा परभणी महानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या तयारीसाठी भाजपा परभणी महानगरच्या वतीने सावली विश्रामगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यशाळेत ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहनभाई कुलकर्णी, राजेशजी देशपांडे, संजयराव शेळके, सरचिटणीस ॲड. एन. डी. देशमुख, भालचंद्र गोरे, शंकर आजेगावकर, मंगल मुदगलकर, नगरसेवक रितेश जैन, मधुकर गव्हाणे, मोकिंद खिल्लारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश टाक, मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, सूरज चोपडे, दैवत लाटे, स्वप्नील पिंगळकर, ऋतुजा जोशी, अनुजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेत सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, विचारवंत (प्रबुद्ध), दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मॅरेथॉन, वोकल फोर लोकल, प्रदर्शन, स्वच्छता मोहिमा, गरजूंसाठी सहाय्य उपक्रम अशा समाजोपयोगी कार्यक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
भाजपाचा ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम हा केवळ सेवा कार्यापुरता मर्यादित नसून, समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा आणि सेवा भाव जागविण्याचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Shabdraj www.shabdraj.com