04/02/26
Breaking News

ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा संस्थेकडून औषधी व बेडशीटचे वाटप

परभणी,दि 13 ः
परभणीतील ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लायन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रामराव कान्हेकर कर्णबधीर, मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालय टाकळी कुंभकर्ण  येथे औषधी, बेडशीट, फळे व चिक्की वाटप करण्यात आले.

परभणीतील लायन्स क्लबचे भीष्मपितामहा ओळखले जाणारे तथा लायन ग्रुप चे माजी प्रांतपाल स्वर्गीय श्री डॉ के सी पारख व ज्येष्ठ समाजसेवक तथा बँकर स्वर्गीय श्री ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा या दोन्ही महानुभावांच्या जयंतीनिमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन निरज पारख व गोविंद शर्मा यांनी नियोजन केले होते. तसेच कार्यक्रमांमध्ये औषधी बेडशीट फळे व चिक्की सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. ह्यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष उदय जैन, लायन निरज पारेख, लायन प्रदीप गोलेचा, लायन जगदीश मुंदडा, कैलास शर्मा, लायन सुनील मुथा, लायन सरोज देशपांडे, लायन संध्या पारख, डॉ मोनिका संचेती, गोविंद ब्रिजमोहनजी शर्मा, रिशील पारख, पवन शर्मा, शिवांगी शर्मा, वर्षा शर्मा तसेच शाळेचे अध्यक्ष डॉ मिलिंद कन्हेकर व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …