04/02/26
Breaking News

पुर्णा रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म

डॉक्टर म्हणजे देवदूत ही प्रचीती पूर्णा शहराला डॉ.कपिल करवंदे यांच्या कार्याने पाहावयास मिळाली
पूर्णा / प्रतिनिधी –
पूर्णा रेल्वेस्टेशवर भगतकीकोठी ही रेल्व नेहमी प्रमाणे आली. त्या ट्रेनने प्रवास करणारी राजस्थानची एक गर्भवती महीला प्रवास करीत होती. तीला आचानक प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या.

 

काही प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. वरिल सर्व प्रकार कर्तव्य बजावत आसनणारे रेल्वे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिल करवंदे यांना कळताच त्यांनी तात्काळ रेल्वे स्टेशनवर जाउन गर्भवती महीलेची तपासणी केली. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्या इतका वेळ नसल्याने वेळेच गांभिर्य पाहता पूर्णेच्या रॉन्चोने गर्भवती महीलेची ट्रेनमध्येच प्रसुती करुन योग्य उपचार करुन नवजात मुलीला व रुग्णास नातेवाईकांन कडे सुखरुप सुपूर्द केले. यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …