23/08/26
Breaking News

अभय अर्जुन दहे यांची हद्दपारी रद्द,विभागीय आयुक्तांचा आदेश

परभणी,दि 13 ः
मानवत येथील अभय अर्जुन दहे यांच्या हद्दपारीचे उपविभागीय दंडाअधिकारी पाथरी यांचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी रद्द केले आहेत अशी माहिती अॅड. सुरेश जांगडा यांनी दिली.
मानवत येथील अभय अर्जुन दहे यास पाथरीच्या उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनी 25 एप्रिल 2025 रोजी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. त्याला दहे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे सुरेश जांगडा यांच्यामार्फत आपील दाखल करत आव्हान केले होते. यावेळी सुनावणी झाल्यानंतर जांगडा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी   अभय दहे यांचे  एक वर्षासाठीचे हद्दपारचे उपविभागीय दंडाधिकारी पाथरी यांचे आदेश रद्द केले आहेत. दहे यांच्यावतीने अॅड. सुरेश जांगडा यांनी काम पाहिले त्यांना अॅड. दिनेश दहे, भुजबळ यांनी सहकार्य केले.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …