सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः
दिव्यांगा कडून त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना सादर करण्यात आले आहे.
दिव्यांगांना व्यवसायसाठी नगर परिषद अंतर्गत २०० चो फूट ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी
५% निधीचे वाटप दिव्यांगाना ३ डिसेंम्बर रोजी करण्यात यावे .
बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली दिव्यांग भवन ची मागणी त्वरित पूर्ण करावी व यासाठी नगर परिषदेकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, आर्थिक तरतूद न करता स्व उत्पन्नाच्या ५% निधी कमी न करता त्वरित वाटप करण्यात यावा,सन २०२२ ते २०२५ पर्यंतचे नगर परिषदेचे स्व निधी चे उत्पन्न किती आहे ते लेखी स्वरूपात देण्यात यावे,घरकुल योजनेत दिव्यांगाना प्राधान्य देण्यात यावे .व ज्यांना घर किंवा घरासाठी जागा नाही त्यांना ५०० चौ फूट ची जागा राहण्यासाठी नागरपरिषदेकडून उपलब्ध करून देण्यात यावी,दिव्यांगाना ५०% घरपट्टी माफ करावी,दिव्यांगाची जन्म नोंद करून प्रमाणपत्र देण्यात यावे,अशोकराव काकडे यांच्या उपस्थितीत दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे यांनी निवेदन सादर केले.
Shabdraj www.shabdraj.com