04/02/26
Breaking News

यंदा नवरात्र, दसरा दिवाळीत मुसळधार…आला इशारा..रेनकोट घालुन फटाके वाजवा

बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा नवरात्र, दसरा दिवाळी पाऊसात जाईल असं वर्तविण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने नवरात्रीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांसह गडगडाटी सरी पडण्याचा अंदाज आहे.

 

पावसाचे आगमन उशिरा झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली असून, ब्रह्मपुरी येथे गुरुवारी सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त आहे.

 

विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट आणि ताशी सुमारे 40 किमी वेगाने वाहणारे वारे यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरं तर 15 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा टप्पा सुरू व्हायला हवा होता; मात्र मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे.

 

काहीशी विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून शुक्रवार सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पावसाची अंदाज देत परिणामी वाहतुकीला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून शहर आणि त्याच्या उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून तथापि, कोकण भागात पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

 

आज सकाळपासून मुंबई आणि त्याच्या उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार आणि वर्धा या १० जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …