04/02/26
Breaking News

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिक्षण परिषद उत्साहात 

सेलू,दि 19 (प्रतिनिधी)ः
येथील कन्या सेलू केंद्रातर्गत मासिक शिक्षण परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.या वेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,साधन व्यक्ती योगेश ढवारे,मोजम शेख,दिपक कांडेकर, कालिदास शिनगारे,मीरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.अगदी खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.या वेळी वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा व माहिती देण्यात आली.

निपुण परभणी या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाबात योगेश ढवारे यांनी माहिती दिली.त्यांनी निपुण परभणी ची माहिती देताना निपुण भारत व निपुण महाराष्ट्र याची पार्श्वभूमी विषद केली व कृती कार्यक्रम सांगितला.कालिदास शिनगारे यांनी खान एकादमी च्या गणित विज्ञान समृद्धी कार्यक्रम या विषयी माहिती दिली. शेख मोजम यांनी अध्ययन निष्पत्ती व सप्टेंबर महिन्याचे नियोजन यावर व्यवहारिक अनुभव कथन करून रंजकतेने विषय प्रतिपादन केले. दिपक कांडेकर यांनी शाळांविकासात लोकसहभागाचे महत्व पटवून दिले तर केंद्र प्रमुख एकनाथ जाधव यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती व सर्व समित्यांचे एकत्रिकरण यावर सखोल माहिती दिली.अतिशय आनंददायी वातावरणात ही शिक्षण परिषद संपन्न झाली.या शिक्षण परिषदेस एकूण 232 शिक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार केंद्र प्रमुख एकनाथ जाधव यांनी केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …