सेलू,दि 20 ः खुल्या प्रवर्गातील समाजघटकांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेतर्फे शुक्रवारी (ता. १९) सायं. ४.३० वा. श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात जिल्हास्तरीय भव्य अमृत मेळावा पार पडला.
या मेळाव्याचा मुख्य उद्देश लक्षित गटातील नागरिकांना शैक्षणिक, कौशल्याधारित व रोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन करणे हा होता.मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक अमृत संस्थेचे राज्य समन्वयक मा. श्री. दीपक जोशी यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजीराव मगर, तसेच उद्योजक सचिन जोशी व सुयश पटवारी यांनी व्यवसायातील संधी व अडचणी यावर थोडक्यात मार्गदर्शन केले.याशिवाय कौशल्य विभाग समन्वयक मा. श्री. योगेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना NIELIT, CIPET, CDAC, IGTR अशा राष्ट्रीय संस्थांमधील शिक्षण व प्रशिक्षण संधींची माहिती दिली.लक्षित गटातील छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व स्टॉल्स उभारण्यात आले होते,हे यावेळी विशेष आकर्षण ठरले . जनागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक श्री. अनिरुद्ध काटे यांनी केले, तर जिल्हा उपव्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.“संस्थेकडून उपलब्ध असलेल्या योजनांचा व शैक्षणिक प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त लाभ घ्या व आपल्या प्रगतीसाठी अमृतचे कार्य व्यापक करा. असे आवाहन यावेळी राज्य समन्वयक दीपक जोशी यांनी केले .
Shabdraj www.shabdraj.com