04/02/26
Breaking News

विद्यापीठासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केले आमरण उपोषण

परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गट क जाहिरात प्रसिद्ध करून गट क च्या उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात  अशी मागणी करत प्रकल्पग्रस्त संघर्ष  समितीने विद्यापीठाच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक 24 पासून अमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी तसेच आमदार डॉ.राहुल पाटील यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसाठी शासनाने मंजुरी दिली परभणी वगळता इतर तीन विद्यापीठांनी गट क आणि गट ड ची जाहिरात प्रकाशित करून पात्र अपात्र याद्या प्रसिद्ध केल्या आहेत तसेच निवड यादी देखील एका विद्यापीठाने जाहीर केली आहे. परंतु परभणीत अजून कोणतीही प्रक्रिया राबवली जात नाही गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होऊन अडीच महिन्याचा कालावधी झाला तरी गट क च्या जाहिरातीचा ठावठिकाणा दिसून येत नाही, विद्यापीठ वेळ काढून पणा करत आहे असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. तात्काळ गट क ची जाहिरात प्रसिद्ध करून अगोदर गट क च्या उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात व त्यानंतर गट ड च्या उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात जेणेकरून उच्चशिक्षित उमेदवारांचे नुकसान होणार नाही अशी मागणी करत प्रकल्पग्रस्तांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये सुनील रणेर, गोविंद शिंदे, स्वप्निल रणेर, लक्ष्मण भाऊराव शिंदे, सोपान ढगे, राम रणेर, लक्ष्मण दत्तराव शिंदे, गोपाळ थोरात, अशोक शिंदे, नवनाथ शिंदे आदींनी सहभाग घेतला असून या उपोषणाला आमदार डॉ.राहुल पाटील यांनी लेखी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच ऑफिसर्स व्हिजन यांनी देखील पाठींबा दिला आहे. कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे  मराठवाडा कार्याध्यक्ष धवलसिंह लावंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे यांचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अनिल कांबळे यांनी देखील पाठींबा दिला आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …