रमेश बिजुले
पाथरी,दि 24 ः
गेली दोन महिने सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी, सामान्यजन मेटाकुटीला आलेला असतांना सोमवारी मराठवाड्यात सर्वदुर अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पिकांचा चिखल झाला असतांना गोदावरी नदी काठावरील अनेक गावात घरात पाणी शिरून संसारोपयोगी, जीवनावश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. छत्रपती संभाजीनगरहून दोन एनडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी होत असल्याने आणि जायकवाडी आणि माजलगाव धरणे शंभर टक्के भरले असल्याने माजलगाव मधून लाख क्युसेक्स आणि जायकवाडीतून एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेले नाथरा, बानेगाव, मंजरथ, गोपेगाव, मरडसगाव, निवळी, पाटोदा, ढालेगाव, रामपुरी, वडी, मसला, गौंडगाव, गुंज, उमरा, अंधापुरी, लिंबा या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे.
गुंज, गौडगाव अंधापुरी उमरा येथील घरात पाणी शिरले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर सर्वच गावांचा संपर्क तुटलेला आहे. गौडगाव, अंधापुरी येथील जिल्हापरिषद शाळा पाण्यात बुडाल्या आहेत. सर्वच गाव पाण्याखाली गेल्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com