04/02/26
Breaking News

पाथरीत सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा

रमेश बिजुले
पाथरी,दि 25 ः
अंधापुरी, उमरा, गोंडगाव येथील गोदावरी नदी काठावरील पूरग्रस्त शेतकऱ्याचा नुकसानीचा पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करत सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

संपूर्ण मराठवाड्‌यात सततच्या पावसामुळे तसेच जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणातील पाणी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यामुळे परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीला प्रचंड महापूर आलेला आहे. नैसर्गिक प्रवाह पात्र सोडून ओसंडून वाहू लागली आहे. त्यामुळे नदी काठावरील शेत जमिनींना नदीचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याऱ्यांचे काही दिवसांवर काढणीस, हाता तोंडाशी आलेल पीक माती मोल झालेलं आहे.

ही. पेरणी करण्यासाठी शेतकयांनी बँकाकडून, खाजगी सावकाराकडून चढ्‌या दराने कर्ज काढलेले होते. त्यामुळे आत्ता हे कार्य कसे फेड़ावचे या चित्तेत शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. गोदावरीच्या या पुरामुळे काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. काही वस्तू वाहून गेले शेतकन्याच्या शेळ्या मेंढ्या, गुरे दोरे मृत्युमुखी पडले तर काही वाहून गेले तरीही प्रशासनाकडून त्यांना गावात जाऊन कसल्याही प्रकारची ना मदत केली ना नुकसानीचे पंचनामे केले, त्यामुळे या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करण्यात येते की या दोन दिवसात आपण स्वतः गावात जाऊन नदी काठच्या सर्व पूरग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून नकसान भरपाई मिळण्याचे लेखी आश्वासन देण्यात यावे अन्यथा, सर्व पुरग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने दिनांक 30 रोजी  गोदावरी नदीच्या आलेल्या पुराच्या पाण्यात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.यावेळी विजय कोल्हे ,दिगंबर कोल्हे ,सुदाम कोल्हे , दिननाथ कोल्हे, सदाशिव कोल्हे, सुरेश कोल्हे ,भीमराव कोल्हे, बाळू शेळके , शेख अनिस, गणेशराव कोल्हे कोल्हे , विकास कोल्हे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …