परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः
शहराती विकास नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन व हवनाचा कार्यक्रम अष्टमीच्या दिवशी मंगळवारी (ता.30) भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या दिवशी महाराजांच्या चरणी तब्बल 6130 पाठांची सेवा रुजू करण्यात आली, ही बाब केंद्राच्या इतिहासातील विशेष उल्लेखनीय ठरली.
सकाळपासूनच महिला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी केंद्रावर जमा होऊ लागली होती. सामूहिक नामस्मरणाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. भक्तीभावाने ओतप्रोत झालेल्या वातावरणात उपस्थितांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.अवकाळी पावसाच्या प्रतिकूलतेवर मात करत, स्वामी समर्थ महाराजांवरील निस्सीम श्रद्धा आणि भक्तीभावाच्या बळावर महिलांनी व सेवेकऱ्यांनी उत्सव यशस्वीरीत्या पार पाडला.या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही केवळ धार्मिक परंपरेची जपणूक नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक शक्तीचे सशक्त प्रतीक म्हणूनही तो परभणीकरांच्या मनात कोरला गेला.
Shabdraj www.shabdraj.com