04/02/26
Breaking News

पं.पलुस्करांचे सगीत क्षेत्रात मोठे योगदान- गोविंदभाऊ जोशी

नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या संगीत समारोहाला चांगला प्रतिसाद

सेलू – भारतीय शास्त्रीय संगीत जनसामांन्या पर्यंत पोहचवण्याठी तसेच संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात इ.स.1901 गांधर्व महाविद्यालय , नासीक येथे रामनाथ आश्रमाची स्थापना,संगीत शिक्षणाची व्यवस्था,असे पंडीत विष्णू दिगंबर पलुस्करांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जेष्ठ संगिततज्ञ गोविंदभाऊ जोशी यांनी केले.

येथील नादब्रंह्म संगीत विद्यालयाच्या वतीने पंडीत पलुस्कर पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक 04 आक्टोबर रोजी नूतन च्या रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित संगीत समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक महेशराव खारकर, मा.प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, डॉ.रामराव रोडगे, मा. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संयोजक पंडीत यशवंतराव चारठाणकर यांची उपस्थिती होती.

स्वा.सेनानी कै.पं.हरिभाऊ चारठाणकर यांच्या सांगितक जीवनावर प्रा गौतम सूर्यवंशी यांनी रचलेल्या “सुर ज्यांचा श्वास होतो” या गिताने संगीत समारोहाचा प्रारंभ झाला, कु.शरण्या मोहकरे, कु.मनवा देशमुख, यथार्थ गवलवाड ,यांनी राग तिलक कामोद सादर करूण रसिकांची दाद मिळवली, सौ. सुषमा दामा, सिमा सुक्ते, आरोही ओगले यांनी राग सारंग, तर कु. इशिता अतुल कुलकर्णी हिने राग पटदीप गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, शंतनु पाठक व पंडित यशवंतराव चारठाणकर यांनी गायन केलेल्या रागांनी श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या महतीची अनुभुती मिळाली, भैरवीने संगीत समारोहाची सांगता करण्यात आली. शिवाजीराव पाठक तबला व शंतनु पाठक, सच्चिदानंद डाखोरे हार्मोनियम, प्रा गंगाधर कान्हेकर ध्वनीव्यवस्था यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रमोद देशमुख, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर नवनाथ गवलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ॲड एल एम सुभेदार, दतात्रय माकोडे, उपेंद्र बेल्लूरकर, डॉ राजेंद्र मुळावेकर, लक्ष्मीकांत डिग्रसकर, शिवनारायण मालाणी, नारायणराव इक्कर, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संतोष पाटील, डॉ विलास मोरे, एन. एम. देशपांडे, रघूनाथ देशमुख, प्रा. ए. टी. देशमुख, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर, निजलिंग तरडगे, सौ. रमा बाहेती, सौ. संगीता खराबे, बाबासाहेब हेलसकर, श्रीपाद कुलकर्णी आदी रसीक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …