सोनपेठ (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे सध्या पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टी मुळे ध्वस्त झालेले असताना विद्यमान निष्क्रिय राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तसेच या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे शिवसेना उभी आहे. त्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि. ०८ बुधवार रोजी सोनपेठ तहसील कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकार कडे अतिवृष्टी मुळे झालेल्या पीक नुकसानी साठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्ती द्यावी, पीक विम्याची निकष तातडीने शिथिल करून पांच्णम्यची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच इतर मागण्यासाठी शिवसेना युवासेनेचे वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सोनपेठ तहसीलदार सुनील कावरखे, नायब तहसीलदार देवेंद्र चंदेल यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला शिवसेना तालुकप्रमुख भगवान पायघन, शहरप्रमुख कृष्णा पिंगळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव, तालुकाप्रमुख संतोष गवळी, शहरप्रमुख अमोल दहीवाळ, संतोष धोंडगे, जनार्दन झिरपे, विष्णू मस्के, माणिक तेलभरे, सुरेश बागवाले, बागुल शेख, बाळासाहेब नरवाडे, रुस्तुम कलिंदर, दिगंबर चौधरी, कैलास गिराम, पवन शिंदे, राम कदम, धनंजय करे, वैभव यादव आदी शिवसैनिक, युवसैनिक उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com