हिंगोली,दि 09ः
आमदार राजू नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आडगाव रंजेबुवा ता. वसमत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवार दिनांक 12 ऑक्टोबरला जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक विजय चव्हाण यांनी दिली.
वसमत तालुक्यातील आडगाव येथील स्पर्धा परीक्षेचा नवोदय पॅटर्न चर्चेत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी म्हणून आणि आमदार नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून एक सामाजिक शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक 5001 द्वितीय पारितोषिक 2001 तृतीय पारितोषिक 2001 उत्तेजनार्थ 500 रुपयांचे पारितोषिक हे 11 या प्रमाणे देण्यात येणार आहेत. हट्टा सर्कल केंद्र अंतर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक विजय चव्हाण यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com