04/02/26
Breaking News

दिव्यांगाना भेट वस्तू देऊन साजरा होणार अभिष्टचिंतन सोहळा

सेलू / नारायण पाटील – दिव्यांगांचे आधारस्तंभ असलेले माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूत भव्य दिव्यांग मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन दि १२ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता करण्यात आले आहे .

येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी उदघाटक म्हणून राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना.मेघनादीदी साकोरे बोर्डीकर या राहणार असून अध्यक्षपदी संघर्ष दिव्यांग संघटना ,सेलू चे अध्यक्ष मा .किशोर साळवे हे राहणार आहेत .परभणी जी प चे मा.सभापती अशोकराव काकडे हे यावेळी सत्कारमूर्ती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ .राजाराम झोडगे हे राहणार आहेत .

 

उपविभागीय अधिकारी मा. शैलेश लाहोटी ,पोलीस उपविभागीय अधिकारी मा .दिपककुमार वाघमारे ,तहसीलदार मा. शिवाजी मगर ,मुख्याधिकारी मा. तुकाराम कदम ,बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ जनार्धन गोळेगावकर , माजी सभापती दिनकरराव वाघ , प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर , बाजार समितीचे संचालक रामेशवरजी राठी , प्रगतशील शेतकरी शफीक अलिखान , अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल , व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी आकात , भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर , शहराध्यक्ष अशोक शेलार ,डॉ अनुपमा जवळेकर ,भा ज प महिला आघाडीच्या संध्याताई चिटणीस व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव उफाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

 

या अभिष्टचिंतन सोहळ्या नंतर कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवाना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू चे वितरण केले जाणार आहे .
तरी शहरातील दिव्यांग बांधवांनी दि १२ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी आठ वाजता आपली नावं नोंदणी करावी .सोबत येतांना दिव्यांग प्रमाणपत्र व आपल्या आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन स्वतः हजर राहणे आवश्यक आहे .
तरी शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव व भगिनींनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संघर्ष दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष पठाण अबरार व सचिव शेख अबरार तसेच सल्लागार पप्पू चव्हाण ,शेख नासेर व प्रकाश भाले यांनी केले आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …