04/02/26
Breaking News

धाकधुक..जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदांची 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

परभणी, दि. 10- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्याकरीता सोमवार, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव, सभेचे ठिकाण, सभेची वेळ पुढील प्रमाणे आहे. जिल्हा परिषद, परभणी-जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, परभणी-बैठक सभागृह, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, परभणी, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, सेलू – बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, सेलू, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, जिंतूर-बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, जिंतूर, वेळ- दुपारी 3.00 वा., पंचायत समिती, पाथरी- ठिकाण- पंचायत समिती सभागृह, पाथरी, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, मानवत- बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, मानवत, वेळ- दुपारी 3.00 वा., पंचायत समिती, सोनपेठ-बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, सोनपेठ, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, गंगाखेड, बैठक सभागृह, नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड, वेळ- सकाळी 11.00 वा., पंचायत समिती, पालम-बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, पालम, वेळ दुपारी 3.00 वा., पंचायत समिती, पूर्णा-बैठक सभागृह, तहसिल कार्यालय, पूर्णा, वेळ दुपारी 3.00.

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …