04/02/26
Breaking News

परभणी जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चीत,वाचा सविस्तर

परभणी, दि. 13
परभणी जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला.

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे.

परभणी जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे दिले आहे.

जिंतूर तालुक्यात
१-वझर बु.- सर्वसाधारण,
२-वाघी धानोरा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
३-सावंगी म्हाळसा-अनुसूचित जाती (महिला)
४-आडगाव बाजार –अनुसूचित जमाती
५-भोगाव – सर्वसाधारण
६-वरुड – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
७-चारठाणा – सर्वसाधारण महिला
८-बोरी – सर्वसाधारण महिला
९-वस्सा – सर्वसाधारण महिला
१०-कौसडी – सर्वसाधारण

परभणी तालुक्यात
११-झरी – सर्वसाधारण
१२-टाकळी बोबडे – सर्वसाधारण महिला
१३-टाकळी कुं. – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
१४-पेडगाव – सर्वसाधारण
१५-जांब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
१६- पिंगळी – अनुसूचित जाती (महिला)
१७-सिंगणापूर – सर्वसाधारण
१८-लोहगाव – सर्वसाधारण
१९-पोखर्णी(नृसिंह) – सर्वसाधारण महिला
२०-दैठणा – सर्वसाधारण महिला

मानवत तालुका
२१-कोल्हा – सर्वसाधारण
२२-ताडबोरगाव – सर्वसाधारण
२३-केकरजवळा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(महिला)
२४-रामपुरी बु. – सर्वसाधारण महिला

सेलू तालुका
२५-चिकलठाणा बुद्रूक – सर्वसाधारण
२६-वालूर – सर्वसाधारण महिला
२७-कुपटा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
२८-रवळगाव – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
२९-देऊळगाव गात – सर्वसाधारण महिला

पाथरी तालुका
३०-हदगाव बु. – सर्वसाधारण
३१-देवनांद्रा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
३२-कासापुरी – सर्वसाधारण
३३-बाभळगाव – सर्वसाधारण महिला
३४-लिंबा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

सोनपेठ तालुका
३५-शेळगाव म. – सर्वसाधारण
३६-नरवाडी – सर्वसाधारण महिला
३७- उखळी बु. – अनुसूचित जाती (महिला)

पूर्णा तालुका
३८-एरंडेश्वर – सर्वसाधारण
३९-चुडावा – अनुसूचित जाती
४०-कावलगाव – अनुसूचित जाती(महिला)
४१- गौर – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(महिला)
४२-ताडकळस – अनुसूचित जाती
४३-वझुर –नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

पालम तालुका
४४-रावराजुर – सर्वसाधारण महिला
४५-पेठशिवणी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
४६-चाटोरी – अनुसूचित जाती
४७-बनवस – सर्वसाधारण

गंगाखेड तालुका
४८-धारासूर – सर्वसाधारण महिला
४९-महातपुरी – सर्वसाधारण महिला
५०-मरडसगाव – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
५१-इसाद – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
५२-गुंजेगाव – सर्वसाधारण महिला
५३-कोद्री – सर्वसाधारण महिला
५४-राणीसावरगाव – सर्वसाधारण.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …