पूर्णा:(सुशीलकुमार दळवी)
पूर्णा पंचायत समितीच्या बारा गणांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.13) दुपारी तीन वाजता पूर्णा येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आली. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे व्यंकटेश जेजुरवार आदीची उपस्थिती होती.
यावेळी गणांच्या आरक्षणाची सोडत एका लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून करण्यात आली. या आरक्षणात पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी, फुलकळस, वझूर, गौर हे गण सर्वसाधारण वर्गासाठी तर इतर मागासवर्गीयासाठी देगाव, इतर मागासवर्गीय महिला कावलगाव, धानोरा, मोत्या तर अनुसूचित जातीसाठी ताडकळस, अनुसूचित जाती महिला चुडावा तर सर्वसाधारण खुला महिलांसाठी एरंडेश्वर, आहेरवाडी,देऊळगाव दुधाटे हे गण निश्चित झाले आहेत. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटाचे आरक्षण सोमवारी परभणी येथे काढण्यात आले. यामधून जिल्हा परिषदेचे पाच गट आरक्षणात सुटले आहेत. तर केवळ एरंडेश्वर हा एकमेव गट सर्वसाधारण वर्गासाठी खुला राहिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक साठी अनेकाची पंचायत झाली आहे.
Shabdraj www.shabdraj.com