23/08/26
Breaking News

अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल सोलापूर येथे निवड

पाथरी,दि 14 (प्रतिनिधी)
ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल, सोलापूर येथे निवड झाली आहे.
विशेष त्याचे पहिले ते पाचवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे झाले सहावी पासून पुढे तो सैनिकी स्कुलला शिक्षण घेईल

अर्णवने कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व पालकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे, कुटुंबीय, शिक्षक बजरंग गिलडा,आदर्श शिक्षक पृथ्वीराज धर्मे,ज्ञानेश्वर निपाणीकर,कालिदास राऊत,भारत सवणे,सुरेखा गंगा सागरे,विलास चव्हाण ,सुनील नवघरे,संदीप टेंगसे व इतर सर्व शिक्षक व शिक्षिका जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान व मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन केले आहे.सैनिकी शाळेत प्रवेश मिळवणे हे देशसेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. भविष्यात अर्णव भारतीय सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …