04/02/26
Breaking News

माजी आमदार लहाने यांच्या कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत

सेलू / नारायण पाटील – माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले एक महिन्याचे पेन्शन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देऊन दायित्व जपले आहे. सदरील एक महिन्याच्या निवृत्ती वेतनाचा धनादेश त्यांनी नुकताच मुबंई येथील शिवसेना बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडे सुपूर्द केला आहे.

यावेळी आ .अर्जुन खोतकर ,हेमंत पाटील ,राजू कापसे ,आनंद भरोसे ,संदीप लहाने ,बाबा काटकर ,अविनाश शेरे ,सखुबाई लटपटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. हरिभाऊ काका लहाने यांनी पदावर असोत किंवा नसोत सतत बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या २०% राजकारण व ८०% समाजकारण हे तत्व अंगिकारले आहे .पदावर नसतांना देखील गोरगरिबांच्या व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीच्या काळात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अडचणी सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो .कार्यकर्त्या सोबत राहून विरोधकासोबत कधीही ते तडजोडीचे राजकारण करत नाहीत .त्यामुळेच पदावर नसतांना देखील कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी आहेत .नुकत्याच झालेल्या अतीवृष्टी मुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे .कितीही मदत त्यांना केली तरी ती कमीच आहे .शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करत आहे .परंतु आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो .या भावनेतून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण ही मदत करीत असल्याचे यावेळी हरिभाऊ लहाने यांनी स्पष्ट केले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …