04/02/26
Breaking News

स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ मार्फत बचत गट स्‍टॉल प्रदर्शन व विक्रीचे आयोजन

पूर्णा प्रतिनिधी / सुशीलकुमार दळवी – दीनदयाळ अंत्‍योदय योजना –राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान नगर परिषद पुर्णा अंतर्गत स्‍वाभिमान शहर स्‍तर संघ मार्फत बचत गट स्‍टॉल प्रदर्शन व विक्री चे आयोजन सावित्रीबाई फूले सभागृह नगर परिषद पूर्णा येथे आयोजित करण्‍यात आले होते. बचत गटातील सदस्‍यांनी उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तुनां बाजारपेठ उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्‍या वस्‍तु, खादय पदार्थ दिवाळीसाठी सजावटीचे साहित्‍य, आर्कषक वस्‍तु तसेच मसाले, पापड, वेगवेगळया चटण्‍या वेगळ्या पद्धतीने केलेली दिवे प्रदर्शनामध्‍ये ठेवण्‍यात आले होते. एकूण १५ बचत गटाने यात सहभाग नोंदवला होता.

कार्यक्रमासाठी उदघाटक म्‍हणून प्रशासकीय अधिकारी मुकुंद मस्‍के, प्रकल्प अधिकारी महेश मोरे प्रमुख पाहुणे श्रध्‍दा चोखट, स्‍वाभिमान शहर स्‍तर संघाच्‍या अध्‍यक्षा द्रोपदी सोनुले व सचिव श्रीमती गोदावरी नारायणकर उपस्थिती होते,मस्‍के यांनी महिलांना मार्गदर्शन करताना उत्‍कृष्‍ट कॉलिटीचे प्रोडक्‍ट आहेत व मागणी नुसार चांगल्‍या प्रकारे तयार करण्‍यात आलेली आहेत. सर्वांनी भरभरुन प्रतिसाद देत व्‍यवसाय वाढीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक समुदाय संघटक श्रीमती पुष्‍पा बनसोडे यांनी केले तर सुत्रसंचालन शहर उपजिविका केंद्राचे व्‍यवस्‍थापक .राहुल जोंधळे यांनी केले व आभार लेखापाल .राजु आहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी समुह संसाधन व्‍यक्‍ती यांनी परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …