सेलू ( प्रतिनिधी )
प्रतिवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलूच्या वतीने सेलू शहराच्या परंपरेला साजेसा असा कार्यक्रम ” “स्वरांगण ” दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दि २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे .
शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये आयोजित या कार्यक्रमसाठी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना .मेघना साकोरे बोर्डीकर राहणार आहेत .तसेच कीर्ती कस्तुरे ( पंढरपूर ) पुणे
या विशेष निमंत्रित गायिका म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे .
स्थानिक नामवंत गायक सच्छिदानंद डाखोरे ,पूजा तोडकर व संजय मंडलिक हे यावेळी भावगीत ,भक्तीगीत ,भूपाळी सादर करणार आहेत .
यावेळी ढोलक साथ सिधोधन कदम ,सिंध साथ नईम शेख ,तबला साथ कार्तिक हिंगणे तर ऑक्टोपेड साथ रतन चिते हे देणार आहेत .
अतुल पाटील हे कार्यक्रमाचे निवेदक राहणार आहेत .
तरी संगीताच्या या बहारदार कार्यक्रमासाठी सर्व रसिक बांधव व भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कै अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे यांनी केले आहे .
Shabdraj www.shabdraj.com