04/02/26
Breaking News

भाजपाकडून परभणीत पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला वेग

परभणी, दि. 19 ऑक्टोबर :
भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी आढावा बैठक आज परभणी महानगर कार्यालयात पार पडली. अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील टप्प्यातील नियोजन यावेळी निश्चित करण्यात आले.

या बैठकीस मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रमुख आमदार संजयजी केनेकर, प्रदेश संयोजक प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, अभियान संयोजक दिपक टाक, सरचिटणीस भालचंद्र गोरे, शंकर आजेगावकर, मंगलताई मुदगलकर, उपाध्यक्ष रितेश जैन, युवा मोर्चाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार, महिला मोर्चाध्यक्ष मनीषा जाधव, ओबीसी मोर्चाध्यक्ष बबलू टाक, अल्पसंख्यांक मोर्चाध्यक्ष हम्मु चाऊस, अनुसूचित जाती मोर्चाध्यक्ष सुमित भालेराव, तसेच मंडळाध्यक्ष सुरज चोपडे, दिपक देशमुख, जोशी सर, सिकंदर खान, प्रवीण गायकवाड, आकाश कदम, अतुल लंगोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या अभियानाची प्रगती, मतदार नोंदणी प्रक्रिया, विभागनिहाय समन्वय आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा झाली.

या वेळी आमदार संजय केनेकर म्हणाले, “भाजपकडून सुरू असलेले पदवीधर मतदार नोंदणी अभियान हे लोकशाही बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र पदवीधराने या अभियानात सहभाग घेऊन मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आम्ही सर्व कार्यकर्त्यांमार्फत करत आहोत.”
बैठकीच्या शेवटी उपस्थित मान्यवरांकडूनही अधिकाधिक पात्र पदवीधरांनी मतदार यादीत नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …