04/02/26
Breaking News

परभणी येथे 30 सैनिकाच्या कुटुंबांचा सन्मान,ज्ञानेश्वर खटिंग यांचा उपक्रम

परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खटिंग यांच्यावतीने  जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी निमित्त बुधवार दि.22 ) शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि दिवाळीनिमित्त फराळ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

देशाचे रक्षण व्हावे याकरिता सीमेवर आपले सैनिक बांधव डोळ्यात तेल घालून कार्य करत असतात त्यांना सणावारालाही सुट्टी मिळणे देखील कठीण असते त्यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या अनुपस्थितीत सण साजरे करण्याचे टाळतात ज्ञानेश्वर खटिंग यांनी मागील पाच वर्षापासून सैन्य दलातील सैनिकाचा व त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी निमित्त सन्मान करण्याचे काम व त्यांच्या सणाच्या आनंदात सहभागी होण्याचे काम सुरू केले असून यावर्षी बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर खटिंग यांनी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त परभणी शहरातील जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलामध्ये हा कार्यक्रम पार पाडला.

सैनिकाच्या कुटुंबियांना शाल ट्रॉफी श्रीफळ व दिवाळीच्या फराळ देऊन सन्मान केला याप्रसंगी सैनिक राजाभाऊ मुंडे, अंकुश चापके,गोविंद वैरागर,अजय रणेर,संदीप पैठणे, विशाल कदम, आकाश झगडे, रत्नेश्वर भिसे,ज्ञानेश्वर कदम, वैभव सूर्यवंशी, प्रल्हाद सूर्यवंशी, अंकुश राऊत, मारुती कदम,आस्तिक गिराम, निलेश गिराम, विशाल आरहाटे , गणेश पुरी,किरण वाघ,सिद्धार्थ कनकुटे हे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ.रामेश्वर नाईक, विठ्ठलराव भुसारे, कृषी भूषण कांतराव काका देशमुख, प्रा.नितीन लोहट,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव,रितेश काळे, रनेर महाराज, माधव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होते या कार्यक्रम चे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले. या कार्यक्रमात कृषी भूषण कांतराव देशमुख , ओमप्रकाश यादव, रितेश काळे,सैनिक राजाभाऊ मुंडे, सैनिक किरण वाघ,पत्रकार सुरज कदम, सुदर्शन चापके , आयोजक ज्ञानेश्वर खटिंग यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास आर्मी रिस्पेक्ट कोर टीम सर्व उपस्थित होती.  वरिष्ठ अभिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण गणेश शिं,मंगेश कुलकर्णी,संतोष शिंदे,ज्ञानेश्वर थोपटे,लक्ष्मण गारकर, डॉ.महेश कडे,सुधीर सोनूनकर,सिद्धेश्वर जाधव,ओम शेठ तलरेजा, पी आय महेश लांडगे, डॉ. श्रीपाद कौसडीकर,डॉ.विजय बोंडे,उषाताई नितीन लोहट,दिलीप शृंगारपुतळे,संदीप देशमुख आणि अर्जुन कच्छवे टीमची उपस्थिती होती.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …