04/02/26
Breaking News

सेलूत १०८ हनुमान चालीसा पठन व महाआरती कार्यक्रम संपन्न

सेलू / प्रतिनिधी – दीपावली पाडव्यानिमित भारतीय जनता पार्टी शाखा ,सेलू च्या वतीने १०८ हनुमान चालीसा पठण ,महाआरती व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन दि २८/१० /२५ मंगळवार रोजी करण्यात आले होते.

 

बालाजी मंदिर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची उपस्थिती होती .तर बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,माजी जी प सभापती अशोकराव काकडे ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,ब्रिजगोपाल तोष्णीवाल ,प्रभाकरराव वाघीकर ,एकनाथराव देशमुख ,रवींद्र डासाळकर ,शिवहारी शेवाळे ,प्रसाद खारकर ,संजय लोया ,गणेश काटकर ,संदीप घुगे ,ज्योती मोगल ,संध्या चिटणीस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मान्यवरांच्या हस्ते व्यंकटेश बालाजी च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हनुमान चालीसा पठन करण्याऱ्या भाविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना बोर्डीकर पुढे म्हणाले की , समाधान व शांती मिळवायची असेल तर अध्यत्माची सांगड व संत महात्म्यांचा सहवास जीवनात असणे अत्यंत आवश्यक आहे.

आनंद मालानी यांचे वाढदिवसानिमित्त यावेळी अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रम ठेवण्यामागील उद्देश प्रास्ताविकात गणेश काटकर यांनी स्पष्ट केला. यावेळी ब्रिजगोपाल तोष्णीवाल ,अशोकराव काकडे ,विनोद बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष मोहकरे यांनी मानले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …