सेलू (नारायण पाटील )
व्यकंटेश बालाजी म्हणजे बऱ्याच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गिरी बालाजीची ओळख असतांना सेलू शहरातील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन असलेले बालाजी मंदिर मात्र अजूनही दुर्लक्षितच होते .
परंतु गल्लीतील तरूण मंडळींनी पुढाकार घेतला आहे.मंदिराच्या नविन बांधकामाचा शुभारंभ झाला आहे.
यासाठी जिल्हा वार्षीक योजना नगरोथान मधून २३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी पालकमंत्री, बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे ,माजी जि प सभापती अशोकराव काकडे ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,गुरुवार पाठ मंडळाचे शंकरराव दिग्रसकर ,ऍड अशोकराव फोफसे ,शिवहारी शेवाळे ,रविभाऊ डासाळकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भय्या दीक्षित याने पौरोहित्य केले.
यावेळी प्रास्ताविकात ऍड कृष्णा शेरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून १०० वर्षा पेक्षा जास्त झालेल्या या बालाजी मंदिर साठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोनेकर यांनी केले.यावेळी परिसरातील प्रतिष्टीत मंडळी ,भा ज प चे पदाधिकारी व कार्यकर्ते ,बालाजी मंदिर कमिटीची तरून मंडळी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com