04/02/26
Breaking News

सालगड्यानेच मारला डल्ला, मालकाचे ५२,५००/- केले लंपास

सेलू / प्रतिनिधी – शेतात काम करणारा सालगडी म्हणजे मालकाच्या विश्वासातील असतो परंतु सालगड्यानेच मालकाच्या खिशातील रक्कम पळवल्याची घटना शिंदे टाकळी येथे घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंदे टाकळी येथील मनोहर गंगाधरराव गजमल यांच्या कडे आरोपी गोविंद बापूराव गजमल हे शिंदे टाकळी येथील गट नंबर ६३ मधील शेत आखाड्यावर सालगडी म्हणून कामाला होता . गोविंद याने २२/७/२५ रोजी आखड्यावरील दरवाजा उघडा असलेल्या राहत्या घरात प्रवेश करून हँगर ला लटकून ठेवलेल्या मालकाच्या पॅन्ट च्या खिशातील ५२,५००/- रुपयांचे बंडल चोरून नेले.

मनोहर गंगाधरराव गजमल यांनी दि १/११/२५ रोजी सेलू पोलिसांत दिलेल्या तक्रारी वरून आरोपी गोविंद बापूराव गजमल यांच्या विरोधात कलम ३०३(२) BNS 2023 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …