04/02/26
Breaking News

ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्याची मागणी

सेलू (नारायण पाटील )
शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश सेलू नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्यात यावा . अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सेलू यांच्याकडे करण्यात आली आहे .
या निवेदनावर सचिन धापसे ,संध्या चिटणीस ,अशोक उफाडे मनीष कदम यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणून सेलूची ओळख आहे .तसेच शहराला शिर्डीचे संत साईबाबा तसेच केशवराज बाबासाहेब महाराजांचा संयुक्त सहवास लाभलेला आहे .त्यासाठी सेलू नगर परिषदेच्या बोधचिन्हात केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा सहभाग असावा अशी बरेच दिवसापासून सेलूकरांची मागणी आहे .
ज्याप्रमाणे शिर्डी ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हात साईबाबांच्या प्रतिमेचा समावेश आहे . साईबाबांचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या पाथरी नगर परिषदेच्या बोधचिन्हात साईबाबांच्या प्रतिमेचा समावेश आहे .संत जनाबाईचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड नगर परिषदेच्या बोधचिन्हात जनाबाईच्या प्रतिमेचा समावेश आहे .तुळजा भवानी मातेचे अधिष्ठान असलेल्या तुळजापूर नगर परिषदेच्या बोधचिन्हात तुळजा मातेच्या प्रतिमेचा समावेश आपल्याला पहावयास मिळत आहे .
त्यानुसार जनभावनेचा आदर ठेऊन सेलू नगर परिषदेच्या बोधचिन्हात केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश करण्यात यावा .अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …