04/02/26
Breaking News

गंगाखेडच्या गौरव दामा यांचे युजीसी परीक्षेत यश

रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 05 
गंगाखेडचे सुपुत्र गौरव (गौरीशंकर) संजय दामा यांनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण भारतभर आपले नाव उज्ज्वल केले आहे. युजीसी अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत दहालाख हून अधिक विद्यार्थ्यांमधून यश संपादन करत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापकपदी त्यांची निवड झाली आहे.

गौरव दामा हे गंगाखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक राजेश दामा यांचे पुतणे आणि संजय दामा यांचे सुपुत्र आहेत.त्यांच्या या यशामुळे काका गंगाधर दामा,सोमेश्वर दामा सह गंगाखेडवासी व परिसरातील सर्वत्र अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वदेशी आखाडा, गंगाखेड यांच्या दिनाक 4 नोव्हेंबर रोजी वतीने गौरव दामा यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संत जनाबाई पालखीचे संचालक शिवाजीराव चौधरी, शिक्षक सिद्धेश्वर कलिंदर, विनायक राठोड, अनिल राठोड यांच्यासह स्वदेशी आखाड्याचे सर्व साधक उपस्थित होते.

सत्कार प्रसंगी आखाड्याचे संचालक प्रकाश डिकळे यांनी गौरवचे अभिनंदन करत म्हटले, “गौरवने मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले आहे. मेहनत घेतली तर यश मिळवणे अशक्य नाही, हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. तरुणांनी त्याचा आदर्श घ्यावा.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी गौरवचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.गंगाखेडचा हा तरुण आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, “गौरवसारखे तरुण हेच आपल्या समाजाचे खरे संपत्ती आहेत,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …