04/02/26
Breaking News

सेलूत बसस्थानकासमोर वाहन लावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

वाहतूक खोळंबली; एकाच रस्त्यामुळे बसचालकांचे होत आहेत हाल
सेलू / प्रतिनिधी –
शहरातील बसस्थानकावर स्थानकात बस येणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट सोडून गुत्तेदार पसार झाल्यामुळे या बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व बसेसला एकच मार्ग असल्याने आणि आज शुक्रवार रोजी एका ३२ वर्षीय तरुणाने बस ये- जा करणाऱ्या या एकच असलेल्या रस्त्यावरच कार उभी केल्याने सुमारे तासभर रस्ता मोकळा करेपर्यंत ट्राफिक बंद होऊन उभयतात एकच गोंधळ सुरू होता.

 

गुत्तेदारांनी मागील ६ महिण्या पासुन काम टाकून गेल्यामुळे असे प्रकार अनेकदा घडले आहेत.पण शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता एका वाहन चालकाने मारुती कार क्रमांक एम. एच. ०१ जी.बी.९२९३ थेट रस्त्यातच उभी केल्यामुळे बसस्थानकात प्रवासी घेऊन येणाऱ्या सुमारे चार बसेस रस्त्यातच अडकून पडल्या. तसेच दुचाकी व अन्य वाहनामुळे सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यात उभी केलेली कार ठाण्यात नेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली. येथील बसस्थानकाचे अर्धवट कामामुळे आज कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची वेळ उद्भवली. वरदळीच्या वेळी बसेस ये-जा मुळे वाहतूक खोळंबते तेव्हा कोणावर गुन्हा दाखल करणार असा प्रश्न प्रवासी बसस्थानक परिसरात विचारत होते.विशेष बाब म्हणजे सेलु बसस्थानकावर येणाऱ्या बाजूने मागील सहा महिन्यापासून रस्ता खोदून ठेवलेला आहे. हे परभणीचे विभागीय वाहतूक नियंत्रक यांना देखील या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. हेच मोठे आश्चर्य आहे.

 

दरम्यान पोलीस हवालदार अजय रासकटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ५४९/२०२५कलम २८५भारतीय न्याय संहिता अन्वये मारुती सुझुकी कार क्रमांक एम.एच. ०१ जी.बी.९२९३ चालक शेख अश्फाक शेख अफसर वय ३२ वर्षे राहणार सवेरा नगर धार रोड परभणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णुदास गरड पुढील तपास करत आहेत.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …