सेलू,दि 11
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी आज दि 11 रोजी येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात विद्यार्थी सुरक्षेचा आढावा घेतला.
विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.त्या समित्यांचे कार्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी सुरक्षा समिती,चिराग समिती,तक्रार पेटी,पोक्सो कायद्याबाबत जनजागृती याबाबत शाळेत सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किशोरवाईल मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र मेळावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना यावेळी गजानन वाघमारे यांनी केल्या.
यावेळी गजानन वाघमारे यांनी स्पष्ट केले की तालुक्यातील इतरही सर्व शाळांचा विद्यार्थी सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे.शाळांनी गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य द्यायला हवे.शाळेत आनंदी व सुरक्षेचे वातावरण विद्यार्थ्यांना वाटावे यासाठी सर्व शाळांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या सूचना वाघमारे यांनी दिल्या.
यावेळी केंद्रप्रमुख एकनाथ जाधव,मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,मुख्याध्यापक संजय धारासुरकर,जनार्दन कदम,हुंबे आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com