04/02/26
Breaking News

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल

सेलू ( प्रतिनिधी )
तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा विविध कारणासह माहेरहून दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी करणाऱ्या विवाहितेच्या पतीसह सासू,सासर्‍यावर १० नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आरती विनोद सोनपसारे वय २३ वर्षे या विवाहितेस तुला कामधंदा येत नाही, स्वयंपाक ही येत नाही, आम्हाला मुलगी पाहिजे पण तुला मुलीच होत आहेत यासह इतर मागण्या करत आरती सोनपसारे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून नेहमीच चापडबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या सासरच्या लोकांनी नवीन दुचाकी साठी एक लाख रुपयाची मागणी करत असाह्य त्रास देत जीवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून दिले. आरती सोनपसारे या विवाहितेचा २४नोव्हेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सासरी विडोळी तालुका मंठा जिल्हा जालना येथे त्रास देण्यात आल्या प्रकरणी आरती विनोद सोनपसारे हिने दिलेल्या फिर्यादीवरून जावक क्रमांक१५८५ भरोसा सेल परभणी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी कायदेशीर करण्याचे पत्रक दिल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांच्या आदेशाने नवरा विनोद विठ्ठल सोनपसारे ,सासू पुष्पा विठ्ठल सोनपसारे, सासरे विठ्ठल बबन सोनपसारे राहणार विडोळी तालुका मंठा यांच्यावर गुरनं५५६/२०२५ कलम ८५,११५/२३५२,३५१/२,३३/५भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …