-पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारातील घटना
पाथरी / प्रतिनिधी – विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारात शनिवारी(दि. १५)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या आगीत भारत गणेश घांडगे यांचा दोन एकर, रामेश्वर भानुदास वरकड यांचा दोन एकर दहा गुंठे, ज्ञानेश्वर वरकड यांचा अडीच एकर, सखाराम संतराम घांडगे यांचा एक एकर, सुभाष आबासाहेब घांडगे यांचा तीन एकर वीस गुंठे, बालासाहेब श्रीमंत घाडगे यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाला. आगीच्या या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील हदगाव येथील ३३ केव्ही विद्युत केंद्र परिसरातील विद्युत प्रवाहित तार अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत ऊस जळून भस्म झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com